नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – तालुक्यातील दुधाळा वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वर्षानुवर्ष वसलेल्या धनवाडी रामनगर या गावातील आदिवासी बांधवांना रानभाजी कांटोळा वरदान ठरत आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाळकेवाडी ओळखली जाते. तेथील कांटोळा हे थेट सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने भाज्यांची हैदराबाद येथे दर शुक्रवारी निर्यात केली जाते.
जंगलामधील रान बाजार तसेच रानफळे विकून उदरनिर्वाह करणारे या भागातील आदिवासी बांधवांना आर्थिक स्रोत निर्माण झाले आहे. या भाजीसाठी रासायनिक फवारणी व खताचा वापर केला जात नाही. रासायनिकदृष्ट्या, पावसाळ्यात येणाऱ्या प्रमुख भाज्यांपैकी कांटोळा ही एक अतिशय पौष्टिक हंगामी भाजी आहे. ही भाजी पावसाळ्यात रानात येते. त्यानंतर आदिवासी बांधव शहरी भागात या भाजीची विक्री करता. कांटोळा भाजी १०० ते १२० रुपये या भावाने विकली जाते. या भाजीला बाजारात प्रचंड मागणी आहे.