महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पर्यावरण

कामा संघटना आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ पर्यावरण दिनी एकल प्लास्टिक बंदीची करणार जनजागृती

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यासाठी तसेच पर्यावरण रक्षणात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी 5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या वतीने कल्याण डोंबिवली ठाकुर्ली विभागात हा उपक्रम राबविला जाणार आहे य सायकल रॅली नंतर एमआयडीसी विभागात वृक्षारोपण केले जाईल अशी माहिती कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.

प्लास्टिकचा वापर वाढल्याने होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलताना सिंगल युज प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. प्लास्टिक बंदीची मोहीम मागील काही दिवसांपासून सुरू आहे आत्ता 5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणासाठी सामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘रनर्स क्लॅन फाउंडेशन’ च्या सहभागाने सायकल रॅलीचे नियोजन कामा संघटनेने केले आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील कामा संघटनेच्या कार्यालयापासून घरडा सर्कल – ठाकुर्ली -90 फुटीरोड मार्गे-पत्रिपुल आणि त्याच मार्गाने परत या मार्गाने काढल्या जाणाऱ्या रॅलीत दोनशेहून अधिक सायकलस्वारानी नोंदणी केली आहे. त्याच बरोबर दुचाकीस्वार आणि रनर्स देखील सहभागी होणार आहेत. तर सकाळी 10 वाजता एमआयडीसी परिसरात कामा संघटनेचे सदस्य वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करतील. तरी जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी नागरिकांनी रविवार 5 जून रोजी सकाळी 7 वाजता होणाऱ्या या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन कामा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »