कल्याण/प्रतिनिधी – कल्याणात खळबळ उडविणारी घटना घडली आहे. एका तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून दोन चोरटे पसार झाल्याचे घटना कल्याण पूर्व येथील पार्किंग परिसरात घडली. या घटनेत तरुणी किरकोळ जखमी झाली आहे ही तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे .ही तरुणी मुंबई अंधेरी परिसरात राहते .कल्याण मधील लोकग्राम परिसरात राहणाऱ्या एका मित्राला लॅपटॉप देण्यासाठी ती कल्याण मध्ये आली होती . याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी या दोन चोरट्यांचा शोध सुरू केलाय .
मुंबई अंधेरी परिसरात राहणारी एक तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. ही तरुणी आज कल्याण येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी कल्याण मध्ये आली होती. कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्टेशन जवळील पार्किंग मध्ये ही तरुणी आली. इतक्यात दोन अज्ञात इसम तिच्याजवळ आले. तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. तिने डोळे मिटले मात्र तिच्या अंगाची आग आग सुरू झाली .याच दरम्यान या चोरट्यानी तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून पळ काढला .या घटनेत ही तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या दोन अज्ञात चोट्यांचा शोध घेत आहेत या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने वेळीच डोळे मिटले त्यामुळे डोळ्याला मोठी इजा होण्यापासून टळली आहे. पण कल्याणात महिला सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.