कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे कल्याण भिवंडी त्याच प्रमाणे मुंबई महानगरात मतदानाला सुरुवात झाली. नागरिकांनी सकाळपासूनच मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद दिला पण कल्याण पश्चिम भागात भिवंडी लोकसभेत अनेक नागरिकांची नावे मतदार यादीत नसल्याने एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर
नागरिकांनी मोठा गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले. मतदार यादीत नाव सापडत नसल्यामुळे मतदान केंद्रात ठिय्या मतदान केंद्रात ठिय्या घालत असल्याचे नागरिकांनी सांगितले.