नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहाड नाका कल्याण पश्चिम या ठिकाणी साईबाबा प्रतिष्ठान कल्याण यांच्यावतीने जनतेला फ्रुटीचे वाटप करण्यात आले होते. यावेळी शहाड नाका या ठिकाणी विदाऊट हेल्मेट वाहन चालकांना अडवून त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्व समजून सांगून त्यांना फ्रुटीचे वाटप करण्यात आले.
हेल्मेट वापरणे किती महत्त्वाचे आहे यावेळी वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. ज्या ज्या वेळी आपण दुचाकीचा वापर कराल त्यावेळी हेल्मेट वापर हा केलाच पाहिजे आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट किती महत्त्वाचे आहे हे यावेळी चालकांना सांगण्यात आले. हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती कल्याण वाहतूक उपविभाग पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दिली.