नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी मंजूर असलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी कोटा पाणी देण्यात आलेला नाही. शासनाने आरक्षित केलेला पाण्याचा कोटा अजून दिला नसल्याने कल्याण डोंबिवली मध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासनाने लक्ष दिल नसल्याने त्याची झळ आता कल्याण डोंबिवली महापालिकेला सोसावी लागत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील ऍलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशात पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा ३१/०८/२०२३ पर्यंत पुरवण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. सदरची तूट भरून काढण्यासाटःई ठाणे पाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी दिनांक ०९/०५/२०२३ पासून आठवड्याच्या दर मंगळवारी २४ तास सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात पाणी पूरवठा बंद असणार आहे. यामध्ये बारावे,मोहाली ,नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण क्षेत्रातून कल्याण पूर्व व पश्चिम,कल्याण ग्रामीण(शहाड,वडवली,आंबिवली टिटवाळा ) डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचा हक्काचा पाणी पुरवठा हा सुरु झाला नसल्याने कल्याण डोंबिवली परिसराला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागू नयेत यासाठी आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी देखील उपस्थित करण्यात आली होती.व आज पर्येंत कल्याण डोंबिवलीकरांना हक्काचा पाणी कोटा मिळवून देण्यासाठी आ. राजू पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष केलं गेलं असल्याने आता कल्याण डोंबिवलीकरांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री कल्याण डोंबिवली करांकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .