Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

देशभरात चोरी करणाऱ्या सराईत चोराला कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – चोर कितीही हुशार असला तरी तो पोलिसांपासून जास्त दिवस लपू नाही शकत. महाराष्ट्र पोलिसांचे नाव ऐकताच चोरांना घाम सुटतो. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी पोलिस त्याला शोधून काढतातच. कल्याणातील कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. सहा राज्याची पोलिस ज्या चोराच्या शोधात होती त्याला फक्त १२ मिनीटात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उत्तर प्रदेशात राहणारा रामविलास गुप्ता याने देशभरात अनेक लहान-मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. शंभरहून जास्त गुन्हे रामविलास याच्या विरोधात दाखल आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, दिल्ली आंध्र प्रदेश या राज्यात तो अनेक गुन्ह्यात फरार आहे. १० एप्रिल रोजी गुजरात पोलिसांच्या हाती रामविलास लागला होता.संधीचा फायदा घेत रामविलास गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला. एवढा मोठा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याने त्याच्या शोधात अनेक पोलिस पथके काम करीत होती. तरीही आरोपी रामविलास पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

रामविलास गुजरात राज्यातून ठाणे जिल्ह्यातील कल्याणात पळून आला होता. रामविलास कल्याणातील एका धाब्यावर असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कल्याणचे डिसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम, दिनकर पगारे यांचे पोलिस पथक कल्याणातील म्हारळ परिसरातील ढाब्यावर अवघ्या १२ मिनीटात पोहचले. रामविलास त्याठिकाणी कोणाच्या तरी प्रतिक्षेत बसला होता. रामविलास परत पसार होऊ नये यासाठी पोलिसांनी चारही बाजूंनी त्याला घेरले. पोलिस कर्मचारी सुशील हांडे, सचिन कदम अन्य सात पोलिसांनी रामविलास याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. आपण पकडले गेलो आहे हे पाहून आरोपीच्या पायाखालची वाळू सरकली. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामविलास ला पकडूण पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रामविलासने चोरी केलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक मोठा बंगला बांधला आहे. दुचाकी आणि चार चाकी ढिगभर गाड्या आहेत. इतका मोठा चोरटा पकडला गेल्याने पोलिसांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे.

Translate »
X