नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीत पावसाच्या आगमनाने नागरिक उन्हाच्या तडाख्याने सुटका झाली म्हणून सुखावले असले तरी ठीक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.दर वर्षी पाण्याचा हा त्रास कल्याण डोंबिवलीकरांच्या पाचवीला पुजलेला दिसत आहे. कल्याण डोंबिवली भागात ठीक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठल्याचे दिसून आले आहे.एकंदरीत पालिका प्रशासनाने कितीही नाले सफाईची दावा केला तरी तो सफसेल फोल ठरल्याचा दिसत आहे.
कल्याण पूर्वेतील शिवाजीनगर वालधुनी येथील रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याचे दिसून आले आहे. आणि या तलावातून मार्ग काढताना नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची चागलीच दमछाक झालेली दिसत आहे.इथे माणसाला चालायला जागा शिल्लक नाही त्याच बरोबर वृद्ध वर्गालाही मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासना विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. जर करोडो रुपये नागरिकांचे नालेसफाईत जात असताना नेहमीच पाणी कसे काय साठते? हा एक संशोधनाचा विषय आहे.त्याच बरोबर नागरिकांच्या मनात असख्य प्रश्न निर्माण होत आहेत आमचे पैसे तर नाल्यात तर जात नाही ना ? असा वेगळाच प्रश्न यावेळी नागरिकांच्या मनात येत आहे. आणि पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून आमची या जन्मी तरी सुटका होईल का? असाही सवाल यावेळी कल्याण डोंबिवलीकर करताना दिसतआहे.
यावरून काही नागरिकांशी बोलणे केले असता ते म्हणतात जर आम्हाला कर भरण्यात उशीर झाला तर आम्हाला दंड आकाराला जातो. तसेच करोडो रुपये आमच्याच कराचे नालेसफाईत घालून सुद्धा जर पाणी साठत असेल तर संधीत अधिकाऱ्यावर दंड का लावण्यात येऊ नये? असाही सवाल यावेळी येथील नागरिकांनी केला.