प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जास्तीत जास्त संशयितांची कोव्हिड तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने १८ ॲन्टिजेन टेस्टिंग सेंटर सुरु केले असून त्या केंद्रामार्फत संशयित रुग्णांची ॲन्टिजेन टेस्ट विनामुल्य केली जाते. महापालिकेच्या १० तापाच्या दवाखान्यात देखील संशयित रुग्णांची विनामुल्य ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येत असून आत्तापर्यंत ३८९८ ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १३७२ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आला. लक्षणे असणा-या संशयित रुग्णांची आर.टी.पी.सी.आर.टेस्ट केली जाते.
फॅमिली डॉक्टर कोव्हिड फायटर” या मोहिमे अंतर्गत महापालिकेकडे सुमारे ७५ खाजगी डॉक्टरांनी सहभाग दर्शविला असून या मोहिमे अंतर्गत एकुण ९२ हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सुमारे १,७३ ,६२८ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण झालेले असून यामध्ये १३७१ रुग्णांचे स्क्रिनींग करण्यात आलेले आहे. महापालिकेचे नगरसेवक त्यांचे स्वयंसेवकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्क्रिनींग व पल्स ऑक्सिमिटरचा वापर करुन ऑक्सिजन पातळी तपासण्याचे काम करुन महापालिकेस सहकार्य करीत आहेत. आपल्या परिसरातील कोव्हिड रुग्णांची संख्या कमी व्हावी याकरीता जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी पुढे येवून सर्व्हेक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. दरम्यान साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटीलयांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे