नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – रात्री अपरात्री रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर चाकू लाठ्या काठ्यानी हल्ला करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हल्ला करून नागरिकांना लुटणाऱ्या या तिघांना कल्याण क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्यात यश आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. नाबिर शेख, प्रेमकुमार गोस्वामी, सूरज विश्वकर्मा अशी तीन लुटारूंची नावे आहेत. या तिघांविरोधात कोळशेवाडी,मानपाडा, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .त्यांच्याकडून तीन मोटरसायकल,पाच मोबाईल फोन असा सुमारे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याण पूर्व मलंग रोडवर एका बार मॅनेजरवर शस्त्राने हल्ला करत त्याच्याजवळ रोकड लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती . त्यापाठोपाठ डोंबिवली पूर्व टाटा पावर परिसरात . रात्रीच्या सुमारास एका नागरिकांवर चाकूने हल्ला करत मोबाईल व पैशांचे पाकीट लुटल्याची घटना घडली होती. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे कोळशेवाडी पोलीस ठाणे मानपाडा पोलीस ठाणे सह कल्याण क्राईम ब्रांचं या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तीन लुटारूंची ओळख पटवली
.तिन्ही आरोपी कल्याणजवळ असलेल्या आंबिवली मोहने येथील एनर्जी कॉलनी परिसरात असल्याची माहिती कल्याण क्राईम बँच मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच पथकाने या परिसरात सापडत या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांविरोधातील डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे, कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे व खडकपाडा पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आणण्यात कल्याण क्राईम ब्रँचला यश आले आहे. रात्री अपरात्री लुटीच्या घटनाने नागरिकांत दहशत निर्माण झाली होती मात्र लुटारूच्या मुसक्या आवल्याळणे नागरिकांनी निःश्वास सोडला आहे .