नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीवरुन कळवा पोलीस स्टेशन मध्ये ३९२/२०२३ भाद.वि.क. ३७९ प्रमाणे दि. ०१/०८/२०२३ रोजी गुन्हा नोंद केला होता. सदर गुन्हयात फिर्यादी याची ३०,०००/ ची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल नं. एम. एम-१३, बीई ९०९४ छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल, कळवा येथील पार्किंग मधुन अज्ञात आरोपीने चोरी केली होती.
काही ठोस माहिती नसताना गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. हवालदार यांनी गुन्हाच्या घटनास्थळ व आजुबाजुचे सी. सी. टी. व्ही कॅमेरा फुटेजची बारकाईने पाहणी करून आरोपीचा गुन्हा करण्यासाठी येण्याचा मार्ग व चोरी करून मोटार सायकलसह जाण्याचा मार्ग नाशिक हायवे मार्गे कल्याण मुरबाड असा असल्याची माहिती प्राप्त केली. त्या आधारे तात्काळ गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उपनिरीक्षक , पो.हवालदार व स्टाफ यांनी मु. पो. टोकावडे, ता. मुरबाड, जि.ठाणे व आधारवाडी कल्याण येथे योग्य प्रकारे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता दोन्ही आरोपींनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपी के १ याचा गुन्हे अभिलेख तपासले असता त्याच्यावर डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २६४/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.नमुद आरोपी अनं ०१ याच्याकडे पोलीस कस्टडी दरम्यान कौशल्यपूर्वक तपास करून त्याने १) छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल, कळवा, २) ठाणा मार्केट, ठाणे, ३) तलावपाळी, ठाणे. ४) कोरम मॉल पार्किंग, ठाणे, ५) वागळे इस्टेट ६) कल्याण कोर्ट परिसर, कल्याण, ७)डोंबिवली पूर्व पश्चिम ८) रुमणी हॉस्पीटल रोड, कल्याण, ९) शहाड रेलवे स्टेशन, शहाड, १०) मुरबाड एस. टी. स्टॅण्ड, मुरबाड इत्यादी परिसरातील हिरो स्प्लेंडर, पॅशन प्रो अॅक्टीव्हा, युनिकॉन अशा मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने, विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे एकुण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत गुन्हयात चोरीस गेलेल्या एकूण ३,२९,८७५/-रु. किंमतीच्या च्या १५ मोटार सायकल हस्तगत करून उल्लेखनिय कामगिरी केले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, सी. पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे, मा .पोलीस उपआयुक्त , मा सहायक पोलीस , ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यानी दिलेल्या सूचनांप्रमाणे करण्यात आलेली आहे. दिलेल्या सुचना व मार्गदर्शन प्रमाणे गुन्हयातील आरोपीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना शिताफीने ताब्यात घेवुन सदरची उल्लेखनिय कामगिरी संपूर्ण टीमने केली आहे. सदर गुन्हयांचा तपास चालू आहे.