नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – गंधार कला संस्थेच्या वतीने सोमवारी गंधार गौरव पुरस्कार सोहळा ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. कल्याणमधील कलासंस्कृती संस्थेने यात सात पुरस्कार पटकावले.मे, २०२२ रोजी कलासंस्कृती संस्थेने गंधार गौरव या बालनाट्य स्पर्धेसाठी २ बालनाट्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे सादर केली होती. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर, आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर, संगीतकार अशोक पत्की, दिग्दर्शक विजू माने, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ यासर्वांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली.
— कलासंस्कृतीला मिळालेली पारितोषिके पुढील प्रमाणे:
सर्वोत्कृष्ट बालनाट्य: गोष्टीची गोष्ट
सर्वोत्कृष्ट लेखन: गोविंद गोडबोले (गोष्टीची गोष्ट)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: रश्मी घुले (गोष्टीची गोष्ट)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा: रश्मी घुले आणि पालक वर्ग (गोष्टीची गोष्ट)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना: मयुरेश मोडक (गोष्टीची गोष्ट)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य: विजय घुले (गोष्टीची गोष्ट)
स्पेशल ज्युरी अवॉर्ड संगीत: सुखदा भावे दाबके (गोष्टीची गोष्ट)
कलासंस्कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पालकांबरोबरच कलासंस्कृती बरोबरच आमचंही पालकत्व स्वीकारलेल्या आणि हक्काने-मायेने आमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मंगेश घाटे, विजय चाव्हरे, दिपक कुंभार यांच्यामुळेच कलासंस्कृतीकडून रंगदेवतेची सेवा घडत राहत असल्याचे रश्मी घुले यांनी सांगितले.