नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना, कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षातील विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या संघटनेचा नियोजनबद्ध विस्तार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भिवंडी मतदारसंघाच्या केलेला विकास आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची पसंती मिळत आहे. त्यादृष्टीकोनातून विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपामध्ये सहभागी होत आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी व कल्याण येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना, कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षातील विविध कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यांचे मंत्री कपिल पाटील यांनी स्वागत केले.
शिवसेनेचे भिवंडी तालुक्यातील डुंगे येथील माजी सरपंच कैलास भगत, नवनाथ पाटील, दिनेश पाटील, भाई तरे, जयेश भोईर, वडघर येथील सत्यवान पाटील, दीपक पाटील, मुकेश पाटील, सरवलीपाडा येथील भगवान भोईर, अॅड. अनिल देवळीकर, दुगाड येथील देवानंद पाटील, गणेश पाटील, गोरसई येथील पप्पू केणे, पवन केणे, सुनिल केणे, प्रकाश केणे, नवनाथ केणे, त्याच प्रमाणे कल्याण पश्चिम येथील वायले नगर येथील सुधीर मनोहर वायले यांनी भाजपात प्रवेश केला
खारबाव येथील बाळाराम भोईर, उमेश तरे, टेंभिवली येथील परेश पाटील, पायगाव येथील रुपेश देवळीकर, मुरबाड तालुक्यातील बोरगाव-शिंदीपाडा येथील अॅड. साईप्रभा बाबरे, विशाखा जुईकर, विनायक जुईकर, सचिन देवकर, केतन पाटील, साईनाथ पाटील, गणपत पाटील, निलेश तरे, राजू पाटील, गणेश शिंदे, अॅड. अनिरुद्ध जाधव, शैलेश जाधव, नरेंद्र पंडित, खालिंग येथील दिनेश जाधव, अंजूर गाव येथील आतिश तरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
या वेळी माजी खासदार जगन्नाथ पाटील, भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल तोंडलीकर आदींची उपस्थिती होती. प्रत्येक समाजातील प्रत्येक उपेक्षित, गरीब आणि गरजू कुटुंबाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या योजनांचा लाभ सामान्य कुटुंबांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी केंद्र सरकारच्या योजना जनते पर्येंत पोहचावा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.