नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून दादर नायगाव येथे जोडे मारो निषेध आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर त्याचा पुतळा जाळून देखील निषेध व्यक्त करण्यात आला. गोपीचंद पडळकर हा एक बालिश बिनडोक असणारा कार्यकर्ता आहे.तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सातत्याने काही बेताळ वक्तव्य करत आहे
.त्याच्या निषेध करण्यासाठी दादर मुंबई येथे आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याच्या विरोधात निवेदन देणार आहेत. यासंदर्भामध्ये पडळकर आणि अशा प्रकारचे जी प्रवृत्ती आहे यांना त्वरित आळा घालण्यासाठी आणि ही महायुती अखंडीत राहण्यासाठी या राज्याच्या कल्याणासाठी अजित पवार यांच्यासारखा नेता उभा राहिला पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यासाठी जाणार आहेत.