नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – शेवगाव तालुक्यातील आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने शेवगाव पंचायत समितीतून मोर्चा काढून शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये आशा प्रवर्तक व गट कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेचे आयटक च्या वतीने गेली ४७ दिवस बेमुदत संप सुरू आहे. १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी यांनी ठिय्या आंदोलन केले. सलग दोन दिवस आंदोलन केल्याच्या नंतर त्यात ठिकाणाहून आझाद मैदान मुंबई येथे आशा व गटप्रवर्तक या न ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांना तोंड देत थान मांडून मुक्कामी आहेत. तरी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचा आदेश काढावा ही मागणी घेवून आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे.
यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे नेते कॅा. संजय नांगरे, कॅा गोरक्षनाथ काकडे, बाबूलाल शेख, बाबूलाल सय्यद, सुवर्णा देशमुख, मंगल चव्हाण, आशा गांडूळे, वैशाली देशमुख, छाया घुले, सुनंदा चेमटे, पुनम गायकवाड, इंदू साबळे, अस्मिता माळी, आलका पाचे, सविता काकडे, कविता बटूळे, तारा आव्हाड, मंदा नागरे आदी सह आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.