महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य मुख्य बातम्या

अलायड डॉक्टर्स हाऊस’ सुपरस्पेशालिटी क्लिनीक रुग्णसेवेत रुजू

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – रुग्णाचे वेळीच निदान आणि उपचार मिळाल्यास बरे होण्याची शक्यता वाढते. अनेकदा रुग्णांना सुपरस्पेशालिटी उपचारांकरिता अथवा निदानासाठी मेट्रोपॅालिटन शहरांकडे पाठवले जाते. याच पार्श्‍वभूमीवर, परवडणाऱ्या दरात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आजारांचे निदान आता कल्याणमध्ये अलाईड डॉक्टर्स हाऊस मध्ये मिळणार असून शहारातील हे पहिले सुपरस्पेशालिटी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.

बैठ्या जीवनशैलीमुळे, आज सर्वच वयोगटातील व्यक्ती जीवनशैलीसंबंधीत विकारांनी ग्रासलेले दिसून येत आहेत. ते दिवस गेले जेव्हा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह किंवा इतर रोग केवळ वृद्ध रुग्णांमध्येच दिसत होते. सर्व वयोगटातील रुग्णांना एकाच छताखाली नामांकित रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून अचूक निदान आणि वेळेवर सल्ला देणे हे अलाईड डॉक्टर्स हाऊसचे उद्दिष्ट आहे. ते किफायतशीर प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी पॅकेज देखील देतात.
अलाईड डॉक्टर्स हाऊसचे संचालक रमेश गुप्ता म्हणाले, समाजाला आरोग्यदायी बनवण्याच्या उद्देशाने, रुग्णाचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी अलायड डॉक्टर्स हाऊस सुपर स्पेशालिटी सल्लामसलत, निदान आणि उपचार यावर भर देत आहे.

शिवाजी चौक या अतिशय मध्यभागी असणा-या श्रीजी तांडले आर्केड येथे सुसज्ज असे ३००० स्केअर फुटमध्ये  ५ ओपीडी, अल्ट्रासाऊंड लॅब, टु-डी इको आणि स्ट्रेस टेस्ट, एक्स-रे सुविधा, फिजिओथेरपी आणि इन-हाऊस फार्मसीसह जवळपास ३००० फूट परिसरात विस्तारले आहे. ५० हून अधिक तज्ञ डॉक्टर याठिकाणी कार्यरत असणार आहेत. फार्मईझी (PharmEasy) सोबत भागीदारी देखील करण्यात आली आहे . यामुळे कल्याणकरांना आणि जवळच्या भागातील लोकांना थोडासा दिलासा मिळू शकेल कारण त्यांना त्यांच्याच परिसरात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार मिळणार आहेत.त्याच बरोबर मध्ये भागी असल्या कारणामुळे रुग्णांना व त्याच्या परीजणांना प्रवाशाचा विचार केला तर सोयीस्कर ठरणार.

या क्लिनीकच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गुरुदत्त भट्ट, डॉ. के. एम. नांजप्पा, डॉ. शकील शेख, डॉ. शशी सिंग, डॉ. गायत्री घाणेकर, डॉ. संध्या कुलकर्णी, डॉ. शशांक आकेरकर आणि विशेष अतिथी डॉ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. श्याम पोटदुखे, अध्यक्ष निमा, डॉ. अनंत इटकर, अध्यक्ष रोटरी, डॉ. छाया घारपुरे, डॉ. जयेश राठोड, अध्यक्ष केएचडीएफ आणि श्री आरटीएन मिलिंद कुलकर्णी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 RY23-24 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट), यांच्यासह अलाइडचे संचालक रमेश गुप्ता, अमीत शर्मा, डाँ.अमित पंजा, रमाकांत गरीबे, निलेश यशवंतराव, शांतनू खांडेकर, पराग धुरके आदी उद्घाटनास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×