नेशन न्यूज़ मराठी टिम.
पालघर/प्रतिनिधी– नुकत्याच झालेल्या BSF / MSF च्या भरती प्रक्रियेत जिजाऊच्या यूपीएससी / एमपीएससी वाचनालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली असून या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने मोफत चालवण्यात येत असलेल्या यूपीएससी/ एमपीएससी अकॅडमीतल्या आठ विद्यार्थ्यानी उज्ज्वल कामगिरी केली आहे. जिजाऊ संस्थेच्या मोफत चालवण्यात येत असलेल्या यूपीएससी/ एमपीएससी अकॅडमीतील सुविधांचा लाभ घेऊन विविध ठिकाणी असलेल्या या वाचनालयातील विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. यामध्ये झडपोली अकॅडमी येथील दिशा फरले बीएसएफ कॉन्स्टेबल , निलेश बसवंत एमएसएफ कॉन्स्टेबल, अजय झिंजुर्डे एमएसएफ कॉन्स्टेबल म्हणून यांची निवड झाली आहे. तर मनोर वाचनालय येथील मयूर आंबेरकर एमएसएफ कॉन्स्टेबल, पडघा वाचनालय येथील भूषण राउत एमएसएफ कॉन्स्टेबल, सरळगाव वाचनालय येथील गणेश धुमाळ एमएसएफ कॉन्स्टेबल , कोनगाव वाचनालय येथील पूजा निकम एमएसएफ कॉन्स्टेबल, माणगाव वाचनालय येथील सोनाली वारक एमएसएफ कॉन्स्टेबल, पदांवर निवड झाली आहे.
२००८ पासून जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था ही विविध माध्यमांतून ठाणे ,पालघर, कोकणातल्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी मोफत यूपीएससी / एमपीएससी अकॅडमी , पोलीस अकॅडमी , JEE , NEET, स्पर्धा परीक्षा मोफत क्लासेस आदी उपक्रम जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे स्वखर्चाने राबवत आहेत. सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग आहे . भविष्यातील करीयरच्या आव्हानांसाठी इथल्या गुणवत्ता असलेल्या ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी , त्यांनी तयार व्हावे यासाठी संस्था विविध ठिकाणी अनेक या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.
या उपक्रमांचा लाभ या भागांतील असंख्य मुला मुलींनी होत आहे. आज येथील अनेक विद्यार्थी विविध स्तरांवर चांगल्या पदांवरती शासकीय सेवा बजावत आहेत . आजतागायत हजारोंच्या संख्येने अधिकारी घडत आहेत. तर आयपीस पर्यंत देखील काहींनी मजल मारली आहे त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने पोलीस भरतीत येथील मुला – मुलींची निवड झाली आहे. तर मुंबई महानगर पालिकेत विविध जागेसाठी ९१० पदांची भरती प्रक्रिया पार पडली . यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचालित जिजाऊ पोलीस सैन्य व अग्निशमन पूर्व प्रशिक्षण केंद्र झडपोली येथून मोफत प्रशिक्षण घेतलेल्या जिजाऊ अकॅडेमीच्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीचे हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड झाली असून या भरतीमधील रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट दिला आहे.
या भागांतील मुलांनी केवळ शिपाई , कारकून म्हणून नोकरी न करता वेगवेगळ्या उच्च पदांवरती त्यांनी आपला लौकिक मिळवावा . आपल्या मातीतल्या माणसांना योग्य न्याय देण्यासाठी आपल्या मातीतले अधिकारी घडले पाहिजेत. हे ध्येय बाळगून जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र काम करत आहेत. जिजाऊ अकॅडमीच्या विद्यार्थां मिळवत असलेल्या यश हे येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल . या भागांतील विद्यार्थ्यानी या मुलांचा आदर्श घेऊन त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. जिजाऊ नेहमीच अश्या विद्यार्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल अश्या भावना यावेळी संस्थापक सांबरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.