महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

ग्राहकांची फसवणूक करून फरार झालेल्या ज्वेलर्सला राजस्थान मधून अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – सोन्याचे दागिने घेऊन कर्ज देत असे सांगून १५ जणांची सुमारे ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका ज्वेलर्स दुकानदाराला डोंबिवली रामनगर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. ठाकुर्लीतील या ज्वेलर्सचे दुकान होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहनसिंह चैनसिंह दसाना असे अटक केलेल्या ज्वेलर्स दुकानदाराचे नाव आहे. सोहनसिंह याचे ठाकुला पूर्वेकडील स्टेशन रोडला महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे.सोहनसिंह याने फिर्यादी मिनू गांधी यांसह १५ जणांना जून २०२२ या महिन्यात दागिने घेवुन त्या मोबदल्यात कर्ज देतो असे सांगितले. सोहनसिंह याने दागिने बनविण्यासाठी आगावू रक्कम घेवुन कोणतेही दागिने बनवुन न देता ३१ हजार ५३ हजार असे रोख रक्कम व दागिने घेऊन पळून गेला.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याच्या विरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.या प्रकरणी सपोनि सानप, पोहवा वाघ, सरनाईक,सांगळे यांनी सोहनसिंह याला राजस्थान येथून अटक केली.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३,( कल्याण ) सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (डोंबिवली विभाग ) सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पो.नि (गुन्हे) शमशेर तडवी यांचे मार्गदर्शनाखाली डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा प्रशांत सरनाईक, निसार पिंजारी , नितीन सांगळे, पो.शि पाटील यांनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×