महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी

नेशन न्यूज मराठी टीम.

कोल्हापूर – 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांना 19 हजार 307 मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले.

विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नारायण स्वामी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे, संतोष कणसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.

विजयी उमेदवार श्रीमती जाधव यांना प्रमाणपत्र देतेवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव यांना 97 हजार 332 तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली.

उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते खालीलप्रमाणे-

अ.क्र.उमेदवाराचे नावपक्षमिळालेली मते
1जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा)इंडियन नॅशनल काँग्रेस97332
2सत्यजीत (नाना) कदमभारतीय जनता पार्टी78025
3यशवंत कृष्णा शेळकेनॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)326
4विजय शामराव केसरकरलोकराज्य जनता पार्टी165
5शाहीद शहाजान शेखवंचित बहुजन आघाडी469
6देसाई सुभाष वैजूअपक्ष98
7बाजीराव सदाशिव नाईकअपक्ष66
8भोसले भारत संभाजीअपक्ष43
9मनिषा मनोहर कारंडेअपक्ष49
10माने अरविंद भिवाअपक्ष58
11मुस्ताक अजीज मुल्लाअपक्ष96
12मुंडे करुणा धनंजयअपक्ष134
13राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईकअपक्ष114
14राजेश सदाशिव कांबळेअपक्ष111
15संजय भिकाजी मागाडेअपक्ष233
16नोटा1799
17रिजेक्टेड36

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×