महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image यशोगाथा लोकप्रिय बातम्या

बार्शी तालुक्यातील जवान रामेश्वर काकडे नक्षलींच्या सोबत दोन हात करताना शहीद

नेशन न्युज मराठी टिम. 

पंढरपूर– सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील जवान छत्तीसगड येथे नक्षल्यांची जवान रामेश्वर काकडे यांना दोन हात करताना वीर मरण आले. दोन दिवसापूर्वी नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये जवान रामेश्वर काकडे हे गंभीर जखमी झाले होते. मात्र बुधवारी दुपारी रायपूर येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर उद्या चार वाजता अंत्यविधी गौडगाव येथे केला जाणार आहे.

रामेश्वर काकडे यांचा विवाह गेल्या वर्षी झाला होता. त्यांना तीन महिन्याचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात वडील वैजनाथ काकडे आई व दोन बहिणी असा परिवार आहे गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पुणे येथे रामेश्वर काकडे यांचे पार्थिव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आणली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या राहत्या गावी गोडगाव येथे त्यांच्यावर दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

बार्शी तालुक्यातील गौडगाव हे रामेश्वर वैजनाथ काकडे यांचे मूळ गाव आहे. रामेश्वर काकडे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण तालुका ठिकाणी झाले आहे. 2012 जम्मू काश्मीर येथे सैन्यात भरती झाले होते. दहा वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात विविध पदावर कार्यरत होते. मात्र सध्या ते छत्तीसगड येथील रायपूर या जिल्ह्यात कार्यरत होते. मात्र दोन दिवसाखाली झालेल्या रायपूर येथील नक्षलींचा सोबत त्यांची चकमक उडाली होती. या चकमकीमध्ये जवान रामेश्वर काकडे हे गंभीर जखमी झाले होते. रायपुर येथे उपचार घेत असताना बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या वडिलांना देण्यात आली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×