महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी देश

जवाहरलाल नेहरू यांनी देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं त्या प्रयत्नांचं आज चीज झालं – शरद पवार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – इस्रोच्या वैज्ञानिक टीममार्फत अवकाशात सोडले गेलेल्या चांद्रयानाचे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर, त्याचे चंद्रावर अवतरण देखील झाले आहे. याचा आनंद भारतभर साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी मुंबई वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये चांद्रयान 3 चे लँडिंग पाहताना आपला आनंद देखील शब्दात व्यक्त केला.

यावेळी पवार म्हणले कि, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण भारतीय वैज्ञानिकांनी हे तंत्रज्ञान यशस्वी करुन भारतला विश्वातला एक नंबरचा देश बनवला आहे. कधी यश येतं कधी अपयश येतं. यश मिळालं म्हणून कधी जमिनीवरचे पाय या देशातल्या वैज्ञानिकांनी कधी हलवले नाहीत. आज चांद्रयान 3 च यशस्वी लँडिंग करुन जगाला दाखवलं की, आमचे वैज्ञानिक हे जागाला प्रोत्साहित करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जवाहरलाल नेहरू यांनी या देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं त्या प्रयत्नांचं आज चीज झालं. मला नेहरू सेंटरने चांद्रयान 3 च यशस्वी लँडिंग पाहण्याची संधी दिली. भारतातल्या सर्व वैज्ञानिकांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो असे शरद पवार म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कायम आपण अपडेट असलं पाहिजेत हे इस्रोने दाखवून दिले. या यशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे महत्व नसून देशातील वैज्ञानिक आणि मेहनत करणाऱ्या लोकांचे कष्ट आहेत त्यांचं हे यश आहे. यामध्ये राजकारण न आणता आपण पाहिलं आहे. असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा वैज्ञानिकांचे अभिनंदन करत आणि आभार मानले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×