Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बीड/प्रतिनिधी – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत. आमचे बॅनर पोस्टर काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहे. आमच्या घराला पोम्प्लेट चिकटवायचे आहेत. ते आम्ही सहन करणार नाही. असं म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं.

यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही. अशी मोहीमच राज्यभर चालवणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितलं. बीड मधील ही पहिली सभा झाल्यानंतर जरांगे पाटील यांच्या पुढच्या दौऱ्यात सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X