नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानक येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.
यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ अ चा ३५ किलोमीटर्सचा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील ३३ स्थानके लोकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. हा टप्पा लोकांच्या सेवेत येण्याने अंधेरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील मुंबईकरांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला होणार आहे. या मेट्रोचे भूमीपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याच हस्ते झाले होते, हा एक मोठा योगायोग आहे. लाखो लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. लोकांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. ही मेट्रो लाखो मुंबईकरांसाठी वरदान ठरेल. मुंबईमध्ये आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रखडलेले हे प्रकल्प आम्ही वेगाने मार्गी लावले आहेत. काँक्रीटचे रस्ते, एसटीपी प्लांट, आरोग्याचे विषय, सुशोभीकरण अशा प्रकल्पांचेही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ही मुंबईकरांसाठी एक मोठी भेट ठरेल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २अ ची वैशिष्ट्ये…
मुंबई मेट्रो कॉरिडॉरमध्ये एकूण ३३७.१ किमी लांबीचे मार्ग बांधणे प्रस्तावित आहे. हे सर्व मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यावर, मेट्रो प्रणालीमध्ये दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीच्या १.३ पट प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असेल.
मुंबई मेट्रो मार्ग ७ विषयी…
मुंबई मेट्रो मार्ग ७ गुंदवली (अंधेरीपूर्व) ते दहिसर पूर्व कॉरिडॉर ही पश्चिम द्रुतगती मार्गालगत असून मुंबई मेट्रो मार्ग ७ मुळे मुंबईच्या पश्चिमेकडील भागांना पूर्वेकडील भागांशी जोडून सेवा देईल.
मुंबई मेट्रो मार्ग ७ मुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-७ टप्पा-१ आणि टप्पा २ या दोन टप्प्यात पूर्ण केली आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-१ ) हा १०.९०२ किमी लांबीचा उन्नत कॉरिडॉर आहे ज्यामध्ये ९ स्थानके आहेत (आरे ते दहिसर (पू)) ज्यामधे (दहिसर (पू) हे स्थानक मुंबई मेट्रो मार्ग २अ अंतर्गत येते.
मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-१) मध्ये (१) ओवरीपाडा (२) राष्ट्रीय उद्यान (३) देवीपाडा (४) मागाठाणे (५) पोईसर (६) आकुर्ली (७) कुरार (८) दिंडोशी (९) आरे या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) ५.५५२ किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे ज्यामध्ये ४ स्थानके आहेत (गुंदवली ते आरे), मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) मध्ये (१) गोरेगाव पूर्व (२) जोगेश्वरी पूर्व (३) मोगरा (४) गुंदवली या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २अ विषयी….
मुंबई मेट्रो मार्ग २अ अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व कॉरिडॉर मुंबईच्या पश्चिमेकडील भागांसाठी अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २अ सुद्धा टप्पा-१ आणि टप्पा-२ या दोन पूर्ण केली आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-१) हा ९.८२८ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये ९ स्थानके आहेत (डहाणुकरवाडी ते दहिसर पूर्व).
मुंबई मेट्रो मार्ग २ अ (टप्पा-१) मध्ये (१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९) डहाणुकरवाडी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) हा ८.७६८ किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग आहे ज्यामध्ये स्थानके आहेत (वळनाई ते अंधेरी प.),
मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) मध्ये (१) वळनई (२) मालाड प. (३) लोअर मालाड (४) पहाड़ी गोरेगाव (५) गोरेगाव प. (६) ओशीवरा (७) लोअर ओशीवरा (८) अंधेरी प. या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ७ – एकूण लांबी १६.५ किमी, एकूण स्थानके १३ (उन्नत)
कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) (१) ओवरीपाडा (२) राष्ट्रीय उद्यान (३) देवीपाडा (४) मागाठाणे (५) पोईसर (६) आकुर्ली (७) कुरार (८) दिंडोशी (९) आरे
टप्पा-२ मधील स्थानके: ४ (१) गोरेगाव पूर्व (२) जोगेश्वरी पूर्व (३) मोगरा (४)
इंटरचेंज स्थानके : (१) गुंदवली- मेट्रो मार्ग १ वरील पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकासोबत (२) जोगेश्वरी पूर्व मेट्रो मार्ग ६ सोबत
मुंबई मेट्रो मार्ग २ अ – एकूण लांबी १८.६ किमी, एकूण स्थानके: १७ (उन्नत)
कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) ((१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९)) डहाणुकरवाडी
टप्पा-२ मधील स्थानके : ८ (१) वळनई (२) मालाड प. (३) लोअर मालाड (४) पहाडी गोरेगाव (५) गोरेगाव प. (६) ओशीवरा (७) लोअर ओशीवरा (८) अंधेरी प.
इंटरचेंज स्थानके : (१) दहिसर पूर्व मेट्रो मार्ग ९ सोबत (२) अंधेरी प. मेट्रो मार्ग १ वरील डी. एन. नगर
Related Posts
-
कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासन पायाभूत सुविधांना…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
हरित हायड्रोजन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी आयआयटी मुंबई आणि एचएसबीसी यांच्यात भागीदारी
मुंबई/प्रतिनिधी - हरित हायड्रोजनचे उत्पादन अधिक कार्यक्षम, किफायतशीर आणि अधिक…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने २६५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
कल्याण -पडघा मार्ग गांधारी पुलावरील रस्त्याला खड्डे, अपघात होण्याची भिती
कल्याण/प्रतिनिधी - अद्याप पावसाला नीटशी सुरुवातही झाली नसली तरी अनेक…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
नाशिकच्या शेतकऱ्यानी फुलवली मिर्ची अन् कलिंगडाची अंतरपीक शेती, शोधला आर्थिक प्रगतीचा मार्ग!
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - कांदा बाजार भावातील मंदी…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
मोऱ्याचा चित्रपटगृहात प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - काही व्यक्ती अश्या असतात…
-
वंचितच्या महामोर्चाचा दणदणीत विजय,लाखो कुटुंबांचा संसार वाचवण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/q4zEQpZaOjo मुंबई/संघर्ष गांगुर्डे -महाराष्ट्रातील गायरान धारक…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत विविध उपाययोजना
मुंबई/ प्रतिनिधी - आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
माहितीपट,लघुपट आणि अनिमेशनपट यांना समर्पित असलेल्या १७ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - माहितीपट,लघुपट आणि अनिमेशनपट यांना…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ मधील प्रकल्पग्रस्तांच एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करणार-नगरविकासमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो…
-
बीएसयुपी योजनेतील घरे लाभार्थ्यांना देण्याचा मार्ग अखेर मोकळा
मुंबई/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राबवण्यात येणाऱ्या बीएसयुपी योजनेतील…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी असा…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
दक्षिण मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयाने ८७६ कोटींची पकडली करचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दक्षिण मुंबई वस्तू आणि…
-
एमपीएसएसीच्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; रिक्त पदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
आयआयटी मुंबई येथे आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
गुंतवणुकीचे मार्ग उद्यासाठी
प्रत्येक व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी काही तरी गुंतवणूक करावी आशी इच्छा…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…