प्रतिनिधी.
अलिबाग– कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यावर दि 25 डिसेंबर 2020 ते दि. 02 जानेवारी 2021 या कालावधीत पर्यटकांच्या प्रवेशास मनाई असल्याचे आदेश जारी केले होते.जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 व 30 तसेच महाराष्ट्र कोविड -19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10 अन्वये प्राप्त अधिकारानुसार कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच एका दिवसात चारशेपेक्षा अधिक पर्यटक मुरुड-जंजिरा किल्ल्यास भेट देणार नाहीत, तिकीट घेताना व बोटीत बसताना गर्दी होणार नाही, याबाबतचे पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याची दक्षता घ्यावी,असेही निर्देश पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावर घेवून जाणे व किल्ल्याविषयी माहिती सांगणे तसेच पर्यटकांना राहण्याची सोय करणे, हा येथील पर्यटन व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा एकमेव पर्याय आहे. पर्यटक येणार असल्याने पर्यटन व्यावसायिकांनी आधीपासूनच पर्यटकांकडून आगाऊ रक्कम स्विकारली असून, ही रक्कम पूर्वतयारीकरिता खर्च झाली असल्याने व हा किल्ला पर्यटनासाठी खुला न केल्यास सर्व व्यावसायिकांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. सध्या ख्रिसमस सण सुरू असल्याने करोना विषाणूच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यासंदर्भात सर्शत परवानगी देण्याबाबत अब्दुल रऊप सिद्दीकी व इतर यांच्या शिष्टमंडळाने मुरुड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाला विनंती केली होती.प्रभारी अधिकारी, मुरुड पोलीस ठाणे यांनी ग्रुप ग्रामपंचायत राजापुरी , ता.मुरूड व जंजिरा पर्यटन संस्था मर्या., मुरुड यांनी मुरुड परिसरातील लोकांची उपजीविका पर्यटनावर असून जंजिरा किल्ला बंद केल्यामुळे आमची उपासमारीची वेळ येईल, आम्ही कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून व योग्य तो खबरदारी घेवून व्यवसाय करण्यास तयार आहोत, तरी जंजिरा किल्ला पर्यटनासाठी खुला करण्यात यावा, अशी विनंती येथील स्थानिकांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला केली आहे तसेच जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला न केल्यास तेथील जनता आंदोलन करण्याची शक्यता आहे, असेही कळविले होते.या वस्तुस्थितीचा विचार करुन रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक व बोटचालक / मालक यांनी मास्क लावणे , फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करणे, बोटीमध्ये मर्यादेपेक्षा कमी पर्यटक नेणे, स्थानिक पोलीस , ग्रामस्थ व त्यांचे स्वंयसेवक यांच्या मदतीने पर्यटकांच्या रांगा लावणे, जंजिरा किल्ल्यामध्ये एका वेळी मर्यादेपेक्षा कमी पर्यटक सोडणे तसेच अपघात होणार नाही, याची खबरदारी घेणे इत्यादी उपायोजना करण्यात येणार आहेत, या बाबींची खात्री करुन तसेच पर्यटकांचा व त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांचा, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, तेथे योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात येईल, अशी शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Related Posts
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
रेमेडियल नियम रद्द झाल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
जळगाव/प्रतिनिधी - कोरोना काळात राज्यातील अनेक विद्यापीठांकडून ऑनलाईन एमसीक्यू पद्धतीने…
-
दुर्गाडी किल्ला परिसरात महावितरणकडून ग्राहक सेवांचा जागर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा…
-
कार्यकर्त्यांचा जल्लोष, पण रुग्णवाहिकेतील चिमुकल्यांचा जीव टांगणीला
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समितीची…
-
नियम पाळा अन्यथा निर्बंध आणखी कठोर - केडीएमसी आयुक्त
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीमध्ये वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता कल्याण डोंबिवली…
-
बोट बुडाली पण,पोलिसाच्या कार्यतत्परतेमुळे वाचले ८८ प्राण
प्रतिनिधी रायगड -आज सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास गेट वे ते…
-
"केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम १९४४" मध्ये महत्त्वाच्या सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
३१ ऑगस्टपर्यंत कोकण किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील…
-
अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा
मुंबई प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा…
-
भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहन नियम २०२२ विषयक अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग…
-
अखेर कल्याण स्टेशन परिसरातील नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीसांची कारवाई
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकामुळे वाहन चालकांना…
-
कोरोनाचे नियम पाळत सोलापूर जिल्ह्यातील शाळांची अखेर घंटा वाजली
सोलापूर/अशोक कांबळे - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची…
-
पारसिक डोंगरातील डावा बोगदा खुला करण्याचा कार्यक्रम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई महानगर प्रदेश विकास…
-
आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल !
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय अंतराळ…
-
एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्युज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत जोडो न्याय…
-
ड्रोन नियम २०२१ नुसार खासगी कंपन्या वस्तू वितरणासाठी ड्रोनचा वापर करू शकतात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेच्या बहुतांश सर्व…
-
कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते,मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग अंतर पोहून केले पार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यातील…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची आयटी नियम, २०२१ अंतर्गत १० यूट्युब चॅनेलवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये,राजकारणी असो किवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच-खा. श्रीकांत शिंदे
डोंबिवली/प्रतिनिधी - राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य, कोरोनाचे नियम हे…
-
निषेध मान्य पण बंद नको,शिवाजी महाराजाच्या बद्दलच्या वक्तव्यावर भूमिका का घेतली गेली नाही - आ. राजू पाटील
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/ylODXWIO8Pg डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - उद्धव ठाकरे…
-
मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ, पर्यटकांसाठी खुश खबर
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात…