महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
मुख्य बातम्या राजकीय

देशातील जनशक्ती इंडीया आघाडीसोबत,ही शक्ती चार जूनला दिसेल – आदित्य ठाकरे

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

संभाजीनागर/प्रातिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या नांदेड येथील महायुतीच्या सभेत इंडिया आघाडीवर टीका केली होती. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक एकमेकांचे कपडे फाडतील, या आघाडीला व काँग्रेसला देशातील 25 टक्के मतदारसंघात उमेदवाराच सापडले नाहीत, असे मोदी म्हणाले होते.

यावर आता आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले “देशातील जनशक्ती इंडीया आघाडीसोबत आहे. ही शक्ती चार जूनला दिसेल.” असा टोला आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला.

तसेच महायुतीबद्दल विचारले असता ते म्हणाले “शिंदेची शिवसेना नाही आहे त्यांचा गद्दार गट आहे. शिंदेंना अर्धे उमेदवार बदलावे लागत आहे. त्यांच्यासारखा निर्लज्ज व नीच व्यक्ती मी कुठे पाहिला नाही आहे. ज्यांनी त्यांना घडविले,राजकीय ओळख दिली त्यांच्याच कठीण काळात एकनाथ शिंदेंनी पाठीत खंजीर खूपसला आहे. महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग गुजरातला पळवले.” अशी जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

Translate »
×