नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण लोकसभा ही नेहमीच शिवसेनेच्या बाजूने कौल देताना दिसली. यामुळे कल्याण लोकसभा ही शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे.पण आता शिवसेनेच्या फुटीनंतर आता येथील मतदार शिवसेनेच्या कोणत्या गटाला विजयी करतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची झाली आहे. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे 2 वेळा निवडून आले होते. शिवसेनेच्या फुटीनंतर आता तिसाऱ्यांदा त्यांना ही निवडणुक सोपी दिसत नाही. कारण शिवसेनेच्या दोन्ही गटांनी या मतदार संघात विजयी होण्यासाठी दंड थोपटले आहेत.
त्यामुळे शिवसेना ठाकरे व शिंदे गटाकडून या मतदारसंघात विशेष लक्ष्य देऊन प्रचार केला जात असल्याचे चित्र आहे. कल्याण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहे. आज वंचित बहुजन आघाडीकडून कल्याण लोकसभेसाठी जमील अहमद खान यांना उमेदवारी दिली गेली होती. वंचितचे (VBA) उमेदवार जमील अहमद खान यांनी कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता कल्याण मतदार संघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जमील अहमद खान यांनी कल्याणच्या जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. ते म्हणाले की “जर मी जिंकून आलो तर कल्याण रेल्वे स्थानकांवर अजून प्लॅटफॉर्म्स बनवणार जेणेकरुन एक्स्प्रेस गाड्या या कल्याण स्थानकावरुन सुटतील. तसेच उल्हासनगरमध्ये कबरिस्तान, ईदगाह, उर्दु शाळा व आंबेडकर भवन बनवणार आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
कल्याणची जनताच येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदानातून दाखवून देईल की त्यांच्या मनात कोणता उमेदवार आहे. त्यांना नक्की कोणाची सत्ता हवी आहे. कारण याआधी कल्याणकरांना निवडणुकीच्या आधी दिली गेलेली अनेक वचने, आश्वासने निवडणुकीनंतर पूर्ण झाली नव्हती. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.