नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – हृदयाबरोबरच आरोग्यासाठीही कांदा फार गुणकारी असतो. त्यामुळेच घरा घरात कांदा आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे महाराष्ट्रात ही कांद्याचे भरपूर उत्पादन घेतली जाते.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कांदा काढणीला आता सुरुवात झाली आहे. यावर्षी कांद्याचे उत्पन्न चांगल्याप्रकारे घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रडवणाऱ्या या कांद्याचा भाव यावेळेस समाधानकारक असल्याने शेतकऱ्याची चिंता कमी झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी इंदूर मार्केटला पसंती देत आहे. इंदूर मार्केट येथे कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी इंदूर येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जात आहेत. अजून काही दिवस कांद्याची साठवण केली तर येणाऱ्या काही दिवसांत भाव वाढेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतऱ्यांनी केली आहे.