नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – शासनाव्दारे DAY-NULM व AMRUT २.० च्या कृतीसंगमामधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची Women For Water, Water For Women Campaign साठी निवड करण्यात आलेली आहे. सदर Campaign अंतर्गत दि. ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता NULM अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचतगटातील ३० महिलांना बारावे WTP (जल शुध्दीकरण प्रकल्प) या ठिकाणी नेण्यात आले.
सदर उपक्रमातुन या महिलांना पाण्याचे महत्व आणि नळाच्या पाण्यामुळे महिलांचे होणारे बळकटीकरण/सशक्तीकरण याबाबत माहिती देण्यात आली, तसेच पाणी शुध्दीकरणाची संपुर्ण प्रक्रिया दाखविण्यात आली व शुध्दीकरण प्रक्रियेची संपुर्ण माहिती देण्यात आली. सहभागी महिलांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये पिशवी, पाणी बाटली व पाण्याचा पेला अशा भेटवस्तु देण्यात आल्या. अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत “जल दिवाळी” उपक्रम संपन्न झाला.