नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – स्वतंत्र विदर्भाची मागणी करत जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्ते यांनी विदर्भातील सर्व आमदार यांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्ण खोपडे यांचा घरावर आज जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्त्यांनी घेराव घालायला जाताना मधेच पोलिसांनी त्यांना रोखले.
कार्यकर्ते यांनी भाजपचे नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 2010 मध्ये जे स्वतंत्र विदर्भाबाबत पत्र लिहून दिलं होतं त्या पत्राची आज भर रस्त्यात होळी करण्यात आली.