नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – आपल्या विनोदी स्वभावशैली तसेच मुलांना हसत खेळत देत असलेल्या शिकवणीमुळे महाराष्ट्रभर गाजलेले कराळे मास्तर पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी मुलांच्या शिकवणीच्या वायरल विडिओ मुळे नाही. तर पंतप्रधान मोदींवर सोडलेल्या टिकास्त्रामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नितेश कराळे(Nitesh mastar) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अहमदनगर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना बळ देण्यासाठी प्रचार करत आहेत.
नगर शहरात संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात ते उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले “2014 आणि 2019 मध्ये मोदींची लाट होती. ती लाट आता राहिली नाही फक्त त्यांचे कार्यकर्ते मोदीजी पुन्हा सत्तेत येणार असे म्हणतात आहेत. बाकी कोणीही म्हणत नाही त्यामुळे 400 पार होणार नाही. 400 पार ही फक्त नौटंकी आहे. 10 वर्षांमध्ये काय केले हे सांगायला जागाच नाही. दुसऱ्याच्या मंगळसूत्राची का काळजी करता आपल्या घरातील मंगळसूत्र पाहा.” अशी जहरी टीका नितेश कराळे यांनी पंतप्रधान मोदींवर(Narendra modi) केली.