नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नांदेड/प्रतिनिधी – नांदेड मतदारसंघ महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील २०२४ च्या उमेदवारांच्या यादीनुसार भारतीय जनता पक्षाकडून प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
नांदेड शहरात महाविकास आघाडीचा प्रचार सुरू आहे. मविआ चे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत हांडोरे प्रचारात सामील झाले होते. त्यांनी या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले “माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुळेच माझी विधान परिषद गेली. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचं वारं वाहत आहे. मी आमच्या भिमशक्ती व दलित घटकांतील सगळ्यांना सांगितले आहे की कुठल्याही परिस्थितीत आमचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहायचे आणि त्यांनाच जनता निवडूण आणणार” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत हांडोरे यांनी दिली.