नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – मुंबईत ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयावर संवाद साधला. महाराष्ट्रात गाजलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील उपोषणकर्ते जरांगे पाटील याच्या बाबत बोलताना राऊत म्हणाले, जरांगे पाटील मागे हटणार नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राण पणाला लावून उपोषण करत आहेत.
समित्या खुप झाल्या आहेत. आता केंद्रात पाच दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. जे केंद्र सरकार विशेष अधिवेशन घेत आहे त्यात मराठा समाज आरक्षण हा विषय आला पाहिजे. सरकारला मराठवाड्यातील कैबिनेट आधी हे सगळं गुंडाळायचं आहे. लोकांनी विरोध करू नये, यांच्या गाड्या फोडू नयेत, रस्त्यावर उतरू नये यासाठीच हे सारं सुरुय.
जी २० च्या बैठकीबाबत ते म्हणाले, जी 20 आलेल्या प्रत्येक देशाला भारतातून काहीतरी मिळवून देण्याचं अमिष दाखवलं गेलं, सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच आले होते.जो बायडेनसोबत केलेला करार प्रकाश आंबेडकरांनी पुराव्यासकट दिला होता.सौदीच्या राजकुमारासोबत केलेला बारसूचा करारही त्याचाच एक भाग आहे.
माजी लष्कर प्रमुखांनी जे जाहीर वक्तव्य केले याबाबत राऊत म्हणाले त्यांनी असे बेजबाबदार वक्तव्य करू नये. आधी लडाख ची जमीन चीन ने बळकावली आहे ती ताब्यात घ्या. आधी लडाख, अरूणाचल इथला विवादीत भाग भारतात आणा.
इंडिया आलायन्स बैठकीतील नंतर ज्या चर्चा ऐकू येत आहेत त्याबाबत स्पष्टता देत राऊत म्हणाले, इंडिया आलायन्स मध्ये कोणताही मतभेद नाही.