नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कामगार किंवा उद्योजकांच्या असोसिएशनचे प्रश्न मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात असोसिएशनच्या कार्यालयात बसून सोडवणे महत्त्वाचे आहे. मंत्री त्यांच्या घरातला आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने मी आज कामा संघटनेला भेट दिली. मात्र कामा संघटनेला त्यांच्या कार्यालयात येऊन भेट देणारा पहिला उद्योग मंत्री ठरलो आहे. कालपासून जे सारखे टीका करत आहेत त्यांनी सांगावं की कितीवेळा ते या ठिकाणी आले. त्यामुळे नुसती टीका करण्यापेक्षा आपली जबाबदारी स्वीकारली तर काम सोपे होते.
तीच जबाबदारी घेत मी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आलो आहे. कामगारांना भविष्यात न्याय देण्यासाठी योग्य भूमिका शिंदे आणि फडणवीस सरकार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी कामा संघटनेच्या भेटीदरम्यान दिले. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, कमल कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.
तत्कालिन मंत्र्यांनी येथील कंपन्या स्थलांतरित करण्याचा जो निर्णय घेतला होता तो नेमका काय आहे ते तपासावे लागेल . यासंदर्भात येथील उद्योजकांशी बोलावे लागेल. जर खरोखर यात तथ्य असेल तर पाऊल उचलावे लागेल. वेदांताची हाय कमिटीची मीटिंग सहा महिन्यांपूर्वी लावणे गरजेचे होते पण ती मीटिंग लावली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ती मीटिंग दोन महिन्यांपूर्वी लावली. मात्र आधीच सहा महिने त्यांना उशीर केल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कल्याण, डोंबिवली , अंबरनाथ येथील बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही. जर काही कारखाने आजारी झाले असतील तर त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येईल. गर्व से कहो हंम हिंदू है हा नारा मुख्यमंत्र्यांनी आता अचानक दिलेला नाही. हा नारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता मात्र गेल्या अडीच वर्षात हा नारा काही जण तो नारा विसरले आहेत.