महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन

प्रतिनिधी.

सोलापूर- माळशिरस तालुक्यातील महाळूंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ – 9001 : 2015 मानांकन प्राप्त झाले आहे. आरोग्य वर्धिनी इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर या आरोग्य केंद्राला अशा प्रकारे बहुमान मिळाल्याचा जिल्हा प्रशासनाला अभिमान आहे. असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

या सेंटरमध्ये हॅण्ड वॉश स्टेशन, ॲटोमॅटिक सॅनिटायझर यंत्रणा बसविण्यात आली आहे. आर.ओ. प्लांट, अखंडीत वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची सुविधा लोकसहभागातून करण्यात आली आहे. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ 24 तास उपलब्ध आहे. कोरोना बाधित रुग्ण व संशियत रुग्ण तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना पी.पी.ई.किट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, हॅण्ड ग्लोव्हज् तसेच उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी सांगितले. तालुक्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातून अथवा इतर ठिकाणाहून संशयित रुग्णांना सेंटरमध्ये आणले जाते. तपासणीनंतर तो संशियत आहे का कोरोना बाधित रुग्ण आहे. त्यानुसार विभागणी करुन संस्थात्मक क्वारंटईन करण्यात येते. संशियत रुग्णांसाठी 34 बेडची तर कोरोना बाधित रुग्णांसाठी 18 बेडची व्यवस्था करण्यात आली. दाखल रुग्णांना प्राथमिक सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये दैनंदिन वापरासाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्क, कपडयांचा व अंगाचा साबण, तेल, पावडर, टॉवेल, नॅपकिन आदी वस्तू दिल्या जातात. रुग्णांना पौष्टीक आणि सकस आहार दिला जातो. आहार प्रत्येकाला डिस्पोजेल प्लेट व ताटात दिला जातो, असे डॉ.रामचंद्र मोहिते यांनी सांगितले. पालकमंत्री भरणे यांनी केले अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

महाळुंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अकलूज तालुका आढावा बैठकीवेळी प्रांताधिकारी शमा पवार, तहसिलदार अभिजीत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते, वैद्यकीय अधिक्ष्क डॉ. सुप्रिया खडतरे यांचे अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली केंद्रास भेटजिल्हाधिकारी शंभरकर यांनी नुकतीच महाळुंग कोविड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी आयुष वैद्यकीय अधीकारी, परीचारीका, यांच्याशी संवाद साधला. यावेळी शमा पवार, तहसिलदार अभिजीत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते आदि उपस्थित होते

Translate »
×