नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – गोळीबाराच्या घटनेने कळवा शहर हादरले आहे, पत्नीची गोळ्या झाडून हत्या करून इसमाने स्वतःवर गोळ्या झाडल्या. कळव्यातील कुंभार आळी परिसरातील यशवंत निवास इथल्या घटनेने कळवा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले . गोळीबार करणाऱ्या इसमाने प्रथम आपली पत्नी हिच्यावर 4 गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वतःवर गोळी झाडली. दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस उपायुक्त गणेश गावडे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे नेमके कारण काय याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.