नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे ते भारताच्या चंद्रयान मोहिमेकडे. चंद्रयान तीन मोहिमेसाठी जे इस्त्रोचे यान उड्डाण घेणार आहे. त्यात गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीने इंजिन सह महत्त्वपूर्ण भाग पुरविले आहेत.कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल या भागांसह इंजिनचे काही भाग पुरविते.
गोदरेज एरोस्पेसच्या या योगदानांनी चंद्रयान आणि मंगळयान यांसारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या चंद्रयान मध्ये बसविण्यात आलेल्या भागाची माहिती आज गोदरेज मार्फत विक्रोळीच्या प्लांट मध्ये देण्यात आली.या वेळी गोदरेज एरोस्पेसचे बिझनेस हेड मानेक बेहरामकामदीन यांनी इस्रोच्या चंद्रयान ३ मोहिमेतील आमच्या योगदानाचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तसेच ही मोहीम आता यशस्वी होईल आणि देशाचे नाव उंचावले जाईल अशी आशा व्यक्त केली.