महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image करियर ताज्या घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी २६सप्टेंबर रोजी मुलाखती

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 3 ऑक्टोबर 2023 ते दि. 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक 54 आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील तरुणांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 26 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) प्रांजल जाधव यांनी केले आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-54 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा व्हॉटसअप क्रमांक 9156073306 या मोबाईल नंबरवर SSB-54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधीत परीशिष्ट उपलब्ध करुन दिले जाईल. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

या कोर्ससाठी प्रशिक्षनार्थीची निवास, भोजन व प्रशिक्षनाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे. केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून यावेत :-

(अ) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेले असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. (ब) एनसीसी ‘C’ सर्टिफीकेट, ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. (क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (ड) विद्यापीठ प्रवेश स्किम (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ व भ्रमणध्वनी क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) श्री. जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×