Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

प्रतिनिधी.

सोलापूर – पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून सजीव सृष्टी उदयास आली. त्यानंतर मानवाने प्रगती करत पृथ्वीवर वैभव प्राप्त केले. पृथ्वीवरील सर्व व्यवस्था व वैभव ही निसर्गावर आधारित असून त्याचे जतन होणे आवश्यक असल्याचे मत नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि बर्डलाइफ आंतरराष्ट्रीय संस्थेचे समन्वयक डॉ. अनुज जैन यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुलामधील पर्यावरणशास्त्र विभागाकडून “बायोमिमिक्री आणि शाश्वत विकास” या विषयावर एक दिवशीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यात डॉ. जैन यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांची ओळख करून दिली. प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. जैन यांनी बायोमिमिक्स म्हणजे काय? याचा दैनंदिन जीवनात तसेच राहणीमानात कसा फायदा होतो, हे स्पष्ट केले. मानवी समस्या सोडविण्यासाठी प्रकृति, मॉडेल्स, प्रणाली, प्रक्रिया आणि घटकांचे अनुकरण करणे किंवा प्रेरणा घेणे या घटकांची तपासणी करणे इत्यादी बाबींचा समावेश म्हणजे बायोमिमिक्स. बायोमिमिक्स आणि शाश्वत विकास यामध्ये परिपत्रक अर्थव्यवस्था, जीवन तत्त्वे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बायोमिमिक्री अभ्यास म्हणजे निसर्गापासून शिकण्याचाच एकात्मिक दृष्टीकोन आहे, असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या मते बायोमिमिक्री आणि बायोमिमेटिक्स हा शब्द ग्रीक बायोसमधून आला आहे. ज्याचा अर्थ जीवन आणि मायमेसिस आहे, ज्याचे अनुकरण करणे आहे, हे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वाढते पर्यावरण प्रदूषण, रोगराई, पर्यावरणीय संकटे इत्यादींमुळे त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, यासाठी बायोमिमिक्रीचा सर्वानी विचार केला तर तो एक प्रकारचा शाश्वत विकास ठरेल, असे सांगितले. निसर्ग हा आपल्या सर्वांचा गुरु आहे. आपण निसर्गापासूनच बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, जसे कि विभक्त कुटुंब पद्धती हे आपण पक्ष्यांपासून शिकू शकतो तसेच स्तलांतरित पक्षांचे वाढते प्रमाण त्याच्यामधील रंगाचे महत्व यावर ही मार्गदर्शन डॉ. फडणवीस यांनी केले. पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. डॉ. श्रीराम राऊत व प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी तांत्रिक सहाय्य केले.

Translate »
X