नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आचार्य जगदीशचंद्र बोस यांची 164 वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विज्ञान भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘जगदीशद्र बोस सत्याग्रही वैज्ञानिकाचे योगदान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती
इंद्रप्रस्थ विज्ञान भारती आणि नवी दिल्लीतील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या सहयोगाने ही परिषद झाली.आचार्य जगदीशचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन करून विज्ञानात दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन दिलेल्या योगदानाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, असा हेतू या परिषदेच्या आयोजनामागे होता. बोस यांनी बिनतारी रेडिओची निर्मिती केली व त्याबद्दल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेने त्यांचा ‘रेडिओ विज्ञानाचे जनक’ म्हणून गौरव केला.