नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्या व राज्याच्या 12 सागरी मैल जलधी क्षेत्रात घुसखोरी करुन मासेमारी करणाऱ्या परराज्यातील मासेमारी नौकांना आळा घालणे व म.सा.मा.नि.अ. 1981 व सुधारित 2021 या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी माहे ऑक्टोबर 2023 पासून पुढील आदेश मिळेपर्यंत सलग महिन्यांकरीता गस्तीनौका भाडेपट्टीने घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार ठाणे व पालघर जिल्ह्याकरीता गस्ती नौका माहे ऑक्टोबर 2023 पासून पुढील आदेश मिळेपर्यंत इच्छुक नौकाधारकांकडून गस्तीनौका भाडेपट्टीने देण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी दरपत्रक सादर करणेबाबत कळविण्यात येत आहे.
तरी इच्छुकांनी त्यांचे दरपत्रक बंद पाकिटामध्ये तांत्रिक लिफाफा (प्रपत्र अ- 1 व प्रपत्र अ-2) व वाणिज्यिक लिफाफा दि. 22 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे ठाणे-पालघर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) दिनेश हं. पाटील यांनी कळविले आहे.