नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ ठाणे झोन क्रीडा समिती आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमध्ये ठाणे विभागातील विविध नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एस.एस.टी.कॉलेज, सी.एच.एम.कॉलेज, बी.के.बिर्ला कॉलेज, डी.जी.एस.कॉलेज, मातोश्री वेलबाई देवजी हरिया कॉलेज शहाड इ. महाविद्यालयांच्या महिला व पुरुष गटांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. या स्पर्धेमध्ये एस.एस.टी.कॉलेजच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून स्पर्धेतील आपली विजयी पताका सुरु ठेवली.
सी.एच.एम.कॉलेजच्या महिला व पुरुष गटाने दुसरा क्रमांक तर बी.के.बिर्ला कॉलेजच्या महिला व पुरुष गटाने तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेमध्ये समन्वयक म्हणून प्रा.नवनाथ गायकर यांनी जबाबदारी पार पाडली. विजेत्या गटांना सन्मानचिन्ह व पदक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये डॉ. चिंतामण भोईर यांनी सूत्र संचालन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा.कोमल चंदनशिवे यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून स्पर्धेतील सहभागी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा बॉल बॅडमिंटन असोशिएशनचे अध्यक्ष प्रा.श्रीराम पवार, मुंबई विद्यापीठ ठाणे झोन क्रीडा समितीचे सचिव प्रा. यज्ञेश्वर बागराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ, गिरीश लटके हे उपस्थित होते.