महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी पर्यटन

खासगी/सार्वजनिक बसच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचना

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – खाजगी / सार्वजनिक बसेस मधून होणारी प्रवाशांची वाहतूक सुरक्षित, सुखकर आणि विना अपघात होण्याच्या दृष्टीकोनातून बस चालक व मालक यांनी संवेदनक्षम होणे गरजेचे असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बस वाहतूकदारांसाठी सूचना दिल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात वाहनचालकांसाठी सूचना दिल्या आहेत.

त्यात बसेसची सर्व कागदपत्रे विशेषतः योग्यता प्रमाणपत्र व विमा अद्यावत असल्याची खात्री करावी, बसेसमध्ये कोणतेही अनधिकृत बदल करू नयेत, वेगनियंत्रक उपकरणांमध्ये कोणतेही फेरबदल अथवा छेडछाड करु नयेत, कायद्याने ठरवून दिलेल्या वेगमर्यादाचे पालन करावे, वाहतूकदारांनी बस चालक मद्यप्राशन करून वाहन चालविणार नाहीत याची दक्षता घ्यावी व याबाबीवर कटाक्षाने देखरेख ठेवावी, वाहनाचे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत व कार्यान्वित असल्याची खात्री करावी, बसमध्ये प्रथमोपचार पेटी व अग्निप्रतिबंधक संयत्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी आणि बसमधून प्रवाशांच्या सामानाव्यतिरिक्त इतर साहित्याची वाहतूक करु नये, या सूचनांचा समावेश आहे. उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन प्रवाशांची सुरक्षित वाहतूक होईल यासाठी सर्व बस वाहतूकदारांनी कटीबध्द रहावे.

परिवहन विभागाने केलेल्या अचानक तपासणीदरम्यान उपरोक्त बाबींचे उल्लंघन केलेले आढळल्यास मोटार वाहन कायदयातील तरतुदींनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व वाहनाच्या पुढील प्रवासासाठी अटकाव करण्यात येईल, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×