महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
देश लोकप्रिय बातम्या

आयएनएस त्रिकंद आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव कटलास एक्सप्रेस २३ मध्ये सहभागी

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

आखाती प्रदेशात 26 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव/ कटलास एक्सप्रेस 2023 (IMX/CE-23) मध्ये आयएनएस त्रिकंद सहभागी झाले आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या सामाईक उद्दिष्टासाठी तसेच व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी 50 पेक्षा अधिक देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांच्या या युद्धसरावात ही भारतीय युद्धनौकाही युद्धाभ्यास करत आहे.

IMX/CE-23 हा जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक आहे. भारतीय नौदलाने पहिल्यांदाच   यात सहभाग घेतला असला तरी, CMF द्वारे आयोजित केलेल्या सरावात भारतीय नौदलाचे जहाज सहभागी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 22 नोव्हेंबर रोजी, आयएनएस त्रिकंदने सीएमएफच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सी स्वॉर्ड 2 मध्ये भाग घेतला होता.

सी स्वॉर्ड 2 आणि IMX/CE-23 अशा युद्ध सरावांमध्ये सहभाग घेतल्यामुळे भारतीय नौदलाला आयओआर मधील सागरी भागीदारांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यास तसेच आंतर-कार्यान्वयन आणि सामूहिक सागरी क्षमता वाढविण्यास मदत मिळते. त्याशिवाय प्रादेशिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी विधायक योगदान देण्यासाठीही या युद्धसराव उपयुक्त ठरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×