Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी मुंबई

आयएनएस मुरगाव स्टील्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

मुंबई/प्रतिनिधी – आयएनएस मुरगाव  (D67), ही भारतीय नौदलाची P15B श्रेणीची दुसरी स्टील्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका  नौदलाच्या ताफ्यात 18 डिसेंबर 22 रोजी मुंबईच्या नेव्हल डॉक यार्ड इथे दाखल झाली. या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.

या प्रसंगी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, जनरल अनिल चौहान, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी, नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग – इन – चीफ, पश्चिम नौदल कमांड तसेच व्हाईस ऍडमिरल नयन प्रसाद (निवृत्त), सीएमडी, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. या समारोहात विनाशिका औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.

कार्यक्रमस्थळी पोचल्यावर राजनाथ सिंग यांना सलामी देण्यात आली. व्हाईस ॲडमिरल नयन प्रसाद (निवृत्त), सीएमडी, एमडीएल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नौदल प्रमुखांचे भाषण झाले. या विनाशिकेचे कमांडिंग  ऑफिसर कॅप्टन कपिल भाटीया, व्हीएसएम यांनी या युद्ध नौकेचा कमिशनिंग वारंट वाचून दाखवला. त्यानंतर या नौकेवर पहिल्यांदाच नौदलाचे चिन्ह फडकविण्यात आले आणि कमिशनिंग बावटा मुख्य खांबावर फडकविण्यात आला. यावेळी नौदल वाद्यवृंदाने राष्ट्रगीत वाजविले. या नंतर प्रमुख पाहुण्यांनी कमिशनिंग प्लाकचे अनावरण करून ही युद्ध नौका राष्ट्राला अर्पण केली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भारतीय नौदलाच्या युद्ध नौका डिझाईन ब्युरोने या  युद्ध नौकेचे डिझाईन तयार केले आहे, P15B श्रेणीत कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणे, समुद्रात राहणे आणि हाताळणीत सहजता यावी म्हणून नवीन डिझाईन संकल्पना अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. यात सुधारित स्टील्थ देखील यात साध्य करण्यात आले आहे, ज्यामुळे ही युद्ध नौका शोधून काढणे कठीण होते. स्वदेशी वस्तूंच्या वापरात लक्षणीय वाढ केल्याने P15B विनाशिका युद्धनौका निर्मिती हे आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण आहे.

आयएनएस मुरगाव  हे स्टील्थ, युद्ध शक्ती आणि सुलभ हाताळणी याचे  मिश्रण आहे. यात जवळजवळ 75% पेक्षा जास्त भाग, सर्व महत्वाची शस्त्रात्रे आणि सेन्सर्स हे एकतर भारतीय ओईएम्सने, किंवा प्रथितयश जागतिक ओईएम्सशी रणनितिक सहकार्य आणि टीओटीच्या माध्यमातून विकसित केले आहे. या नौकेची बांधणी 17 सप्टेंबर 2016 ला सुरु झाली आणि दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी, गोवा मुक्तीला 60 वर्ष पूर्ण  झाल्याच्या दिवशी, या नौकेची समुद्र सफर सुरु झाली. आणि 18 डिसेंबर 2022 रोजी नौदलात दाखल होणे याला विशेष महत्व आहे, ते म्हणजे 1961 मध्ये याच दिवशी पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजयची सुरवात आली होती.

गोव्यातील ऐतिहासिक किनारी शहराच्या नावावरून, आयएनएस मुरगावचे नाव ठेवण्यात आले आहे. या नौकेची जवळपास 300 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची क्षमता आहे. हिंद महासागर क्षेत्रात सतत बदलती शक्ती समीकरणे बघता, या नौकेची सर्व परिस्थितीत काम करण्याची क्षमता यामुळे भारतीय नौसेनेच्या हालचाली, पोहोच आणि मोहीम फत्ते करण्यास गरजेची असलेल्या लवचिकतेत वाढ होईल. या युद्ध नौकेचे नौदलात दाखल होणे हे भारताच्या, या क्षेत्रात सर्वप्रथम कारवाई करणारा आणि पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून वाढत्या क्षमतेचे द्योतक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X