WWW.nationnewsmarathi.com
मुंबई/प्रतिनिधी – आज सकाळपासून रोहित पवार यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यानंतर आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार गटातर्फे ठिय्या आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गट कार्यालयासमोर करण्यात आले आहे
सकाळपासून रोहित पवार यांची सुरू असलेली चौकशी अद्याप सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. आज सकाळपासून रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही घरी जाण्यासाठी सांगितले आहे. कारण की आज सकाळपासून ते दिवसभर थांबलेले आहेत. मात्र त्यांनी घरी जाण्यास साफ नकार दिलेला आहे
जोपर्यंत रोहित पवार ED कार्यालयाच्याबाहेर सुखरूप येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भाजपासमोर गुडघे टेकलेल्यांच्या चौकशा बंद झाल्यात आणि पण रोहित पवार कोणापुढेही गुडघे टेकणार नसल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले.
तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या आजी म्हणजेच शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये नातू रोहित पवार यांच्या काळजीपोटी आल्या होत्या. मात्र त्यांनाही आम्ही घरी जाण्यासाठी विनंती केली परंतु त्यांनी सुद्धा रोहित पवार यांची ईडी कार्यालयाबाहेर येण्याची प्रतीक्षा केली, असे विद्या चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे