नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या, 40 टक्के अनुदान घेणाऱ्या तसेच त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना यापुढे पुढील टप्प्यातील वेतन अनुदान लागू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याचा सुमारे 60 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून यासाठी अंदाजे 1160 कोटी रूपये इतका निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल उपस्थित होते.
राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी २० टक्के/ वाढीव २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, मूल्यांकनात अनुदानासाठी पात्र अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/ नैसर्गिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री.केसरकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शासन निर्णय दि. १२ फेब्रुवारी २०२१, दि. १५ फेब्रुवारी २०२१ व दि. २४ फेब्रुवारी २०२१ सोबतच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना/ तुकड्यांना अनुदानासाठी निधीसह पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १३५ शाळांमधील व ६६९ तुकड्यांवर कार्यरत २ हजार ८०१ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरिता प्रतिवर्ष ५०.०९ कोटी रूपये खर्च होणार आहे. त्याचप्रमाणे २८४ शाळांमधील व ७५८ तुकड्यांवर कार्यरत ३ हजार १८९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ४० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून याकरिता प्रतिवर्ष ५५.५१ कोटी रूपये खर्च होणार आहे.
दि.१२ फेब्रुवारी २०२१, दि. १५ फेब्रुवारी २०२१ व दि. २४ फेब्रुवारी, २०२१ अन्वये २० टक्के व वाढीव २० टक्के अनुदानास पात्र केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील २० टक्के टप्पा (२० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना ४० टक्के व ४० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना ६० टक्के इतके वेतन अनुदान) मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २२८ शाळांमधील व २ हजार ६५० तुकड्यांवर कार्यरत १२ हजार ८०७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २० टक्के (एकूण ४० टक्के) अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरीता प्रतिवर्ष २५०.१३ कोटी रूपये खर्च होणार आहे. त्याचप्रमाणे वाढीव २० टक्के वेतन घेत असलेल्या (४० टक्के) २००९ शाळांमधील व ४ हजार १११ तुकड्यांवर कार्यरत २१ हजार ४२३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २० टक्के (एकूण ६० टक्के) अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरीता प्रतिवर्ष ३७५.८४ कोटी रूपये खर्च होणार आहे.
त्याचप्रमाणे सुमारे १० वर्षापासून प्रलंबित असलेल्या मूल्यांकनात पात्र ठरलेल्या तथापि शासनस्तरावर अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शासन निर्णय दि. १९ सप्टेंबर २०१६ नुसार सरसकट २० टक्के अनुदानासाठी पात्र करून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ७७१ शाळांमधील व ७ हजार ६८३ तुकड्यांवर कार्यरत २२ हजार ९६० शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याकरीता प्रतिवर्ष ४२९.३१ कोटी रूपये खर्च होणार आहे.
राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी २० टक्के/ वाढीव २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, तसेच, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/ नैसर्गिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करण्याकरीता अंदाजे रु.११६०.०० कोटी इतका निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६०,००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे.
विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने आठव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाने वेतन अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडवल्यामुळे शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्यास हातभार लागेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
Related Posts
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र…
-
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के वेतन तर शासकीय कर्मचाऱ्यांना ५० ते ७५ टक्केच वेतन
प्रतिनिधी मुंबई - कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक…
-
शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सहा हजार पदे लवकरच भरणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे…
-
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई /प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…
-
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन व फरक
प्रतिनिधी. पुणे - ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर…
-
नमुंमपा अधिकारी, कर्मचार्याची दिवाळी गोड, ३० हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टिम. नवीमुंबई/प्रतिनिधी - 10 नोव्हेंबरपासून दिवाळी सण…
-
महिला आर्थिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा लाभ,वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य वेतन सुधारणा समिती…
-
कोविड-19 वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी . लातूर - महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
कल्याणातील मराठी शाळेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद, मोबाईलविना शिक्षण थाबलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुरु
कल्याण/प्रतिनिधी -आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उच्च न्यायालयाकडून आज…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
केडीएमसीच्या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्या- वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - आजचे विद्यार्थी हे देशाचे…
-
पाल्यांच्या आरोग्याची लेखी हमी शाळेने देण्याची शिक्षण स्वाभिमानी संघटनेची मागणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने १…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील मत्स्य आणि जलजीवन…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’,शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज…
-
मुंबईत देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील बारावीच्या 15…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
सरकार गरिबांना दर्जेदार शिक्षण देण्यास असमर्थ - अबू आसिम आझमी
भिवंडी प्रतिनिधी - सरकारी शाळांमध्ये गरिबांना योग्य व दर्जेदार शिक्षण…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकार्य महाविद्यालयातील…