नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्याची शहानिशा होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्यावर आले असताना दिली.
मोदी सरकारच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला झाल्याचा सत्यपाल मलिकांनी मोठा गौप्यस्फोट केला असून याबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, सत्यपाल मलिक हेदेखील भाजपचे होते त्यामुळे त्यांना देखील बरेचसे माहिती असेल. नेत्यांनी जी माहिती दिली आहे त्याची शहानिशा करणे गरजेचे असून कोणी तपास यंत्रणा तपास करीत असेल त्यांनी त्या पद्धतीने हा तपास करायला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले
अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत असून यावेळी ते महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर पक्ष बांधणीचे काम करणार आहेत. यावर भुजबळ म्हणाले की, नक्कीच मुंबई महानगरपालिका सर्वात मोठी महानगरपालिका असून देशाचं ही महानगरपालिका नाक आहे. त्यामुळे प्रत्येकालाच साहजिकच वाटते की ही महानगरपालिका आपल्या ताब्यात राहावी ,महानगरपालिकेचा महापौर आपल्या पक्षाचा असल्या पाहिजे त्याकरता हे सगळेजण सध्या मोर्चे बांधणी करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.