नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात कापूस पिकासोबत मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला त्यामुळे पेरणी देखील उशिराने झाली, परंतु जुलैमध्ये पावसाचे आगमन झाले आणि मका पीक वाढू लागलं शेतात डोलू लागले चोपडा तालुक्यात खरीप हंगामात मका पिकाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. मात्र गेल्या वर्षा प्रमाणे चोपडा तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भाव झालेला आहे.
या लष्करी अळी मका पिकाच्या झाडावर पानाचा आत असलेली लष्करी अळी मका पिकाची मोठी हानी करत आहे. मका पिकासोबत इतर पिकावर देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मका पिकावर थोडा तरी लष्करी अळीचा प्रादुर्भाव निदर्शनात आला तर शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क ची फवारणी केल्यास लष्करी अळीच्या प्रादुर्भाव कमी होऊ शकतो असे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी माहिती दिली.