नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – सध्या भारतातील सर्वच राजकीय पक्ष हे इंडिया आघाडीच्या बैठकीची वाट पाहत आहेत. तापलेले राजकीय वातावरण पाहता सर्वपक्षीय बैठकीची नितांत आवश्यकता होती. येत्या ३० ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजू वाघमारे प्रवक्ते कॉंग्रेस यांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. तेव्हा ते युती आणि इंडिया ह्यांचा फरक आता जनताच ठरवेल.
महाविकास आघाडी मार्फत या इंडियाच्या बैठकीतच संपूर्ण तयारी करत आहेत. तिन्ही पक्षा पूर्ण ताकतीने सर्व नियोजनामध्ये गुंतली आहे. आजपासूनच काही प्रमुख नेत्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. इंडिया बैठकीचे ‘जुडेगा इंडिया और जितेगा इंडिया’घोषवाक्य आहे. दंगली घडवण्याचे राजकारण सध्या सुरु आहे त्यासाठी इंडियाची गरज या देशाला आहे. अशी टिकाही राजू वाघमारे यांनी केली.