नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – बँकॉक थायलंड येथे २५ ते ३० एप्रिल या दरम्यान झालेल्या महिला एशियन बीच हँडबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाने द्वितीय उपविजेतेपद पटकावले.यात कल्याण येथे राहणारी खेळाडू आणि भारतीय महिला संघाची कर्णधार रेखा अर्जुन कांबळे हिने द्वितीय उपविजेतेपदाची ट्रॉफी पटकावत कल्याणकरांचे नाव उंचावले आहे.
कोरोना काळात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. यात भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करत भारतीय महिला संघाने द्वितीय उपविजेतेपदाला गवसणी घातली. टीम चे हेड कोच म्हणून राजस्थान राज्य क्रीडा परिषद चे हँडबॉल कोच प्रियदीप सिंह यांची निवड झाली होती. हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव डॉ. तेजराज सिंह हे टीम चे अभिनंदन केले. तसेच कल्याण मध्ये येताच रेखाचे स्वागत करण्यात आले.
इंडिया केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अप्पा शिंदे, जिजाऊ क्रीडा मंडळ कल्याण येथील राजेश मानवडे तसेच रेखा यांचे पती मनोज जाधव आणि संपूर्ण कुटुंब, एस एस टी महाविद्यालय उल्हासनगर येथील क्रीडा संचालक राहुल अकुल यांनी तीचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भारतीय टीमरेखा अर्जून कांबळे (कप्तान) महाराष्ट्र, वैष्णवी जाधव, मानसी परब, नताशा भगवान साहनी,(महाराष्ट्र), सिध्दी कौशिक, तान्या सिंह (राजस्थान),बितिका रभा,शेफाली दास (पश्चिम बंगाल),सिमाबेन आश्र्विनभाई चौधरी(गुजरात)हेड कोच – प्रीयदिप सिंह (राजस्थान)कोच – इंथोनी गोमस (महाराष्ट्र)विश्र्नुवधन बोड्डू (तेलंगणा)